बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मंदिर परिसरात चपला घालून केला प्रवेश !

सामाजिक माध्यमांतून टीका

गोपालगंज (बिहार) – येथील थावे शहरातील प्रसिद्ध थावेमाता मंदिरात बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेेते तेजस्वी यादव चपला घालून गेल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपने यादव यांच्यावर टीका केली आहे, तसेच सामाजिक माध्यमांतूनही यादव यांच्यावर टीका होत आहे. तेजस्वी यादव मंदिराच्या परिसरात असतांनाच एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यात त्यांच्या पायात चपला आहेत, तर त्यांच्या समवेत असणार्‍यांनी चपला काढलेल्या दिसत आहेत.

संपादकीय भूमिका

मंदिरात चपला घालून जाऊ नये, हे ठाऊक असतांनाही अशा प्रकारची कृती केल्याच्या प्रकरणी तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ! यादव जर मशिदीत असे गेले असते, तर त्यांच्या विरोधात आतापर्यंत फतवा निघाला असता !