ज्यांच्याविषयी साधकांना दैवी अनुभूती येतात, ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या प्रसाधनगृहातील ‘फ्लश’च्या पाण्याचा नाद ऐकतांना शंकूच्या आकाराची रंगीत वर्तुळे आणि त्याच्या मुळाशी कालचक्र दिसणे अन् ‘ॐ’कार ऐकू येणे : ‘९.१२.२०२१ या दिवशी भक्तीसत्संगामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या प्रसाधनगृहातील ‘फ्लश’च्या पाण्याचा नाद ऐकवला होता. मी डोळे मिटून तो नाद ऐकत असतांना माझ्या आज्ञाचक्रासमोर मला गोलाकारात शंकूच्या आकाराची (कॉनिकल) लाल, पिवळ्या अन् पांढर्या रंगाची वर्तुळे पुष्कळ गतीने फिरत दूरपर्यंत जातांना दिसत होती. त्या वर्तुळांच्या मुळाशी मला एक कालचक्र दिसले आणि तेही मंद गतीने फिरत होते. ते फिरत असतांना मला ‘ॐ’ कारचा ध्वनी ऐकू येत होता. त्या वेळी ‘मी कुठे आहे ?’, याचे मला भान नव्हते. मला केवळ तो ‘ॐ’कारचा नाद ऐकू येत होता आणि माझ्या मिटलेल्या डोळ्यांसमोर ‘शंकूच्या आकारातील गतीने फिरणारी रंगीत वर्तुळे आणि कालचक्र’ एवढेच दृश्य मला दिसत होते.’
– सौ. वृंदा मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |