(हवाला म्हणजे आखाती देश आणि दक्षिण आशियातील देश पैशांचे हस्तांतर करण्यासाठी वापरली जाणारी एक विशिष्ट प्रणाली)
नवी देहली – देहली पोलीस आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तोयबा, अल्-बदर आदी जिहादी संघटनांना हवालाद्वारे पैसे पाठवणार्या महंमद यासीन याला तुर्कमान गेट येथून अटक केली. तो कापडाचा व्यापारी आहे. तो विदेशातून आलेले पैसे काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना पाठवत होता. त्याने काश्मीरमध्ये एका आतंकवाद्याला १० लाख रुपये पाठवल्याची माहिती मिळाली आहे. या पैशांचा वापर आतंकवादी कारवायांसाठी करण्यात आला. जम्मू-काश्मीरने राज्यातील पुंछ येथून त्याच्या अब्दुल हामिद या सहकार्याला अटक केली आहे.
Delhi Police arrests Hawala operator Mohammed Yaseen, was involved in funding of LeT, Al-Badr terrorists in Kashmir https://t.co/16J97P2UkJ
— OpIndia.com (@OpIndia_com) August 19, 2022
यासीन याच्याकडे दक्षिण आफ्रिका, तसेच भारतातील सूरत आणि मुंबई येथून पैसे येत होते. तेथून तो हे पैसे काश्मीरमध्ये पाठवत होता. त्याने आतापर्यंत अशा प्रकारे २४ लाख रुपये पाठवले आहेत.
संपादकीय भूमिका‘हवाला’ हे आतंकवादी कृत्य अथवा अन्य गैरकृत्यांसाठी पैसा पाठवण्याचे माध्यम असल्याचे वारंवार सिद्ध होऊनही सरकार या प्रणालीवर बंदी का घालत नाही ? |