आक्रमणकर्त्यांच्या बचावासाठी मोहसीन आणि आसिफ तलवार घेऊन होते सिद्ध !

  • उदयपूर हत्याकांड प्रकरण

  • आरोपींना १० दिवसांची कोठडी

जयपूर (राजस्थान) – रियाज अत्तारी आणि महंमद गौस हे कन्हैयालाल यांची हत्या करत असतांना त्यांच्यावर आक्रमण झाल्यास त्यांचा बचाव करण्यासाठी आणखी दोघेजण तलवार घेऊन घटनास्थळी उपस्थित होते, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (‘एन्.आय.ए.’ला) मिळाली आहे. मोहसीन खान (२५) आणि आसिफ हुसैन (२४) अशी त्यांची नावे असून पोलिसांनी त्यांना आधीच अटक केली आहे. २ जुलै या दिवशी जयपूर न्यायालयाने चौघांनाही १० दिवसांची ‘एन्आयए’ कोठडी सुनावली आहे.

कन्हैयालाल यांची हत्या करत असतांना प्रतिआक्रमण झाल्यास किंवा आक्रमणकर्ते पकडले गेल्यास त्यांच्या सुटकेसाठी त्या ठिकाणी हे दोघे होते. त्यांनीच रियाज आणि गौस यांना मोटारसायकलने तेथे आणले होते, तसेच आक्रमणानंतरही त्यांच्याच दुचाकीने ते फरारही झाले होते.

जयपूर न्यायालयाच्या परिसरात नागरिकांकडून जिहाद्यांना मारहाण !

आरोपींना जयपूर न्यायालयात घेऊन जात असताना संतप्त जमावाने त्यांच्यावर आक्रमण केले. नागरिकांनी आरोपींना मारहाण करत त्यांचे कपडे फाडले, तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘आरोपींना मरेपर्यंत फाशी द्या’, अशा घोषणा देण्यात आल्या. आरोपींना ‘पोलीस व्हॅन’मध्ये परत घेऊन जात असतांनाही लोकांनी त्यांच्यावर आक्रमण केले.