सैन्याने एका रात्रीत उभारलेल्या २ पुलांमुळे अमरनाथ यात्रेचा मार्ग मोकळा !

श्रीनगर – भारतीय सैन्याने एका रात्रीत जम्मू-काश्मीरमध्ये दोन पूल उभारले. त्यामुळे अमरनाथ यात्रे सुरळीत चालू झाली आहे. अमरनाथ यात्रेच्या मार्गावरील बालटाल येथे दोन पूल भूस्खलनामुळे वाहून गेल्याने अमरनाथ यात्रेच्या मार्गात विघ्ने निर्माण झाली होती. त्यानंतर प्रशासनाने सैन्याच्या ‘चिनार कोर’ विभागाला हे पूल पुन्हा उभारण्याची विनंती केली. सैन्याने खराब हवामान आणि अंधाराच्या अडथळ्यांचा सामना करत हे पूल उभारले.

अमरनाथ यात्रा ३० जून या दिवशी चालू झाली असून पहिल्या तुकडीमध्ये २ सहस्र ७५० भाविक कडेकोट बंदोबस्तात दर्शनासाठी मार्गस्थ झाले.

संपादकीय भूमिका

जनहिताची कामे पूर्ण करण्यासाठी वर्षानुवर्षे लावणारे सुस्त प्रशासन यातून काही बोध घेईल का ?