|
कारवार, ३० जून – कर्नाटकातील भटकळ नगरपालिका मंडळावर कन्नड, इंग्रजी याचबरोबर उर्दू भाषेचा फलक लावण्यात आला आहे. कन्नड भाषिक कार्यकर्ते आणि हिंदु संघटनांचे कार्यकर्ते यांनी भटकळ नगरपालिका मंडळावर मोर्चा नेऊन उर्दू भाषेतील फलक हटवण्याची मागणी केली; मात्र मुसलमानांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करून फलक हटवण्यास नकार दर्शवला. (उर्दू भाषेसाठीसुद्धा मुसलमान त्वरित संघटित होतात, यातून हिंदूंनी शिकावे ! – संपादक) या वेळी दोन्ही गटांमध्ये वाद आणि आरोप-प्रत्यारोप झाले. या वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी मध्यस्थी केली. सध्या हे प्रकरण कारवार जिल्हाधिकार्यांपर्यंत पोचले आहे. कर्नाटक राज्यात कारवार येथे देवनागरी कोकणी विरुद्ध कन्नड भाषिक यांच्यामध्ये वाद झाला होता. आता भटकळ येथे उर्दू विरुद्ध कन्नड असा वाद चालू झाला आहे.
(सौजन्य : SahilOnline Bhatkal)
‘कर्नाटक रक्षण वेदिके’ या कन्नड भाषिक संघटनेने कर्नाटक राज्यात देवनागरी लिपीतील कोकणी फलकाच्या विरोधात आंदोलन छेडल्यानंतर भटकळ नगरपालिका मंडळाने देवनागरी कोकणीतील फलक हटवले. (‘कर्नाटक रक्षण वेदिके’ ही संघटना आता देवनागरी कोकणीतील फलकाप्रमाणे उर्दूतील फलक हटवण्यास पालिका मंडळाला भाग पाडणार कि धर्मांधांसमोर हार पत्करणार ? – संपादक) भटकळ नगरपालिका मंडळाच्या इमारतीचे नुकतेच सुशोभिकरण करून रंगरंगोटी करण्यात आली. यानंतर पालिकेने पालिकेच्या इमारतीवर कन्नड, इंग्रजी याचबरोबर उर्दू भाषेतील फलक लावले. यामुळे कन्नड भाषिक आणि हिंदु संघटनांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली.
संपादकीय भूमिकापालिका महामंडळाने राष्ट्रभाषा हिंदीतून फलक का लावले नाहीत ? त्यापेक्षा उर्दू भाषा त्यांना जवळची वाटली का ? यातून कर्नाटक पालिका महामंडळाची प्रवृत्ती दिसून येते ! |