१. ‘प्रोफाईल मेंबर्स’च्या (हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर संपर्क करून आलेल्या धर्मप्रेमींच्या) संदर्भात लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !
१ अ. गुढीपाडव्याच्या संदर्भातील सूत्रे
१ अ १. श्री. विनायक रोडगे, श्री. शुभम् जाधव, श्री. नीलेश कारंडे आणि श्री. सचिन गर्जे या ४ धर्मप्रेमींनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्थानिक वृत्तपत्रांमध्ये ‘वाचकांची पत्रे’ या सदरामध्ये ‘हिंदु वर्ष गुढीपाडव्याला साजरे करावे’, याविषयी पत्रे लिहून पाठवली.
१ अ २. श्री. चंद्रशेखर पाटील या धर्मप्रेमींची प्रकृती ठीक नसतांनाही त्यांनी सहकाऱ्यांना गुढीपाडवा सणाविषयी माहिती सांगून स्वतःही गुढी उभारली.
१ अ ३. प्रवचनात गुढीपाडव्याचा विषय मांडण्याचा प्रयत्न करणे आणि शेजाऱ्यांनाही गुढीपाडव्याचे महत्त्व सांगणे : श्री. नीलेश कारंडे यांनी ‘गुढीपाडवा’ या विषयावर प्रवचन करतांना त्यातील एक भाग अभ्यासपूर्ण आणि चांगल्या प्रकारे मांडला. त्यानंतर त्यांना त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे जाणवले. ते सहसा कुणाशी फार बोलत नाहीत; पण त्यांनी प्रवचनात विषय मांडण्याचा चांगला प्रयत्न केला. गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी त्यांच्या शेजारी रहाणाऱ्या राजस्थानी कुटुंबालाही हिंदीमधून गुढीपाडव्याचे महत्त्व सांगितले.
१ अ ४. श्री. अभय शेरबंदे यांनी त्यांच्या नातेवाइकांना गुढीपाडव्याविषयी माहिती सांगितली. त्यांनी वर्गात सांगितल्याप्रमाणे भाव ठेवून गुढीपाडवा सण साजरा केला.
१ अ ५. मित्रांचे प्रबोधन केल्यावर त्यांनी भगवा ध्वज उभा न करता गुढी उभारण्याचे मान्य करणे : श्री. पंकज भालेराव यांना त्यांच्या काही मित्रांकडून ‘व्हाट्स ॲप’वर ‘गुढी न उभारता भगवा ध्वज लावा’, अशा आशयाचे संदेश आले होते. त्यानंतर त्यांनी त्या मित्रांचे प्रबोधन केले. त्यांनी त्यांना सांगितले, ‘‘हा प्रचार चुकीचा असून याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. हा प्रचार हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी केला जात आहे.’’ त्यानंतर त्यांच्या मित्रांनी पंकजदादांनी सांगितल्याप्रमाणे गुढी उभारण्याचे मान्य केले.
१ अ ६. कोलवडी येथील धर्मप्रेमींनी स्वतःहून पुढाकार घेऊन गावाजवळच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाच्या शेजारी सामूहिक गुढी उभारली.
१ आ. धर्मशिक्षणवर्गात सांगितल्याप्रमाणे आचारधर्मानुसार कृती केल्याने ईश्वरी चैतन्य मिळणे : धर्मशिक्षणवर्गात ‘आचारधर्मानुसार करावयाच्या कृती’ या विषयाच्या अंतर्गत दैनंदिन कृतींविषयी सांगितले होते. धर्मप्रेमींनी त्यानुसार कृती केल्यावर त्यांना नेहमीपेक्षा अधिक प्रसन्न वाटून ईश्वरी चैतन्य मिळत असल्याचे जाणवले.
२. धर्मप्रेमींचा अभ्यासवर्ग
धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींच्या माध्यमातून ‘श्रीरामनवमी’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचन करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामध्ये विषय मांडण्याची क्षमता असलेल्या धर्मप्रेमींना प्राधान्याने विषय मांडण्याची संधी देण्याचे ठरवले. त्यासाठी ‘श्रीरामनवमीचा विषय कसा मांडायचा ?’, याविषयी अभ्यास होण्याच्या दृष्टीने जिल्हा स्तरावर धर्मप्रेमींसाठी अभ्यासवर्ग घेण्यात आला. त्याला २१ कृतीशील धर्मप्रेमी जोडले होते. त्या सर्वांनी उत्साहाने प्रवचनात विषय मांडण्याची सिद्धता दर्शवली. त्यानुसार आतापर्यंत झालेल्या प्रवचनांमध्ये अनेक धर्मप्रेमींनी तळमळीने आणि अभ्यासपूर्ण विषय मांडला.
३. ‘सोशल मिडिया’द्वारे (सामाजिक माध्यमांद्वारे) प्रसार
एप्रिल मासाच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील १०२ धर्मप्रेमींनी ‘व्हाट्सॲप’च्या माध्यमातून, ३३ धर्मप्रेमींनी ‘फेसबूक’च्या माध्यमातून आणि ४४ धर्मप्रेमींनी ट्विटरच्या माध्यमातून धर्मसेवेत सहभाग घेतला.
– श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे (२५.४.२०२१)