परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बोल सत्यात उतरल्याची साधिकेला आलेली प्रचीती !

१. आध्यात्मिक त्रासामुळे साधिकेच्या यजमानांनी साधना सोडून नोकरी करणे आणि साधिका रामनाथी आश्रमात आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तिला ‘वेळ आल्यावर यजमान निश्चित साधनेत येतील’, असे सांगणे

‘मी आणि माझे पती दोघेही पूर्णवेळ साधना करतो. माझ्या यजमानांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्यांच्या मनात वाईट शक्ती साधना आणि साधक यांच्याविषयी नकारात्मक विचार निर्माण करत असत. या विचारांमुळे त्यांचे मन अस्वस्थ होऊन त्यांचा आध्यात्मिक त्रास वाढत असे. तेव्हा मला त्यांची पुष्कळ काळजी वाटत होती. त्यानंतर वर्ष २०१२ मध्ये ते साधना सोडून नोकरी करू लागले. त्या काळात काही सेवेनिमित्त मी रामनाथी आश्रमात जात होते. तेव्हा एकदा मला परात्पर गुरुदेवांचा सत्संग लाभला. त्या वेळी त्यांनी माझ्या यजमानांविषयी विचारले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही काळजी करू नका. वेळ आल्यावर ते निश्चित साधनेत येतील. तुम्ही आपल्या साधनेकडे लक्ष द्या.’’

२. वर्ष २०१८ पासून यजमानांनी सेवेला आरंभ करणे आणि वर्ष २०२० मध्ये रामनाथी आश्रमात येऊन स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यास आरंभ करणे

आता ३ वर्षांपासून म्हणजे वर्ष २०१८ पासून माझे यजमान पुन्हा सेवाकेंद्रात राहून सेवा करत आहेत. सेवेला आरंभ केल्यावर २ वर्षांनंतर, म्हणजे वर्ष २०२० मध्ये त्यांना नामजपादी उपायांसाठी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात जाण्याची संधी मिळाली. तेव्हा ते पुष्कळ संघर्ष करून रामनाथीला गेले. २ मास त्यांनी नामजपादी उपाय आणि सेवा केल्या. त्यानंतर ते सेवेनिमित्त सेवाकेंद्रात आले. ते ऑगस्ट २०२१ मध्ये पुन्हा रामनाथी आश्रमात आले. आता त्यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यास आरंभ केला आहे.

३. केवळ गुरुदेवांच्या कृपेने यजमान साधनेत टिकून रहाणे आणि साधना अन् सेवा आनंदाने करत असणे

यजमानांची ही स्थिती पाहून मला गुरुदेवांनी १० वर्षांपूर्वी सांगितलेल्या ‘तुम्ही काळजी करू नका. वेळ आल्यावर ते नक्की साधनेत येतील. तुम्ही तुमच्या साधनेकडे लक्ष द्या’, या त्यांच्या वाक्याचे स्मरण झाले. यावरून ‘भगवंत भक्ताला दिलेले वचन पूर्ण करतो’, याची जाणीव झाली. आता ते साधनेत टिकून आहेत. ते साधना आणि सेवा आनंदाने करत आहेत. हे केवळ गुरुदेवांच्या कृपेनेच घडले आहे.

४. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘हे प्राणप्रिय गुरुदेव, ‘प्रत्येक जिवाचे वर्तमान आणि भविष्य यांची स्थिती आपल्याला ज्ञात असते. ‘आपल्याशी जोडलेल्या प्रत्येक जिवाला आपण आपल्या प्रेमाच्या बंधनाने बांधून ठेवता’, हेच आमचे सौभाग्य आहे. गुरुदेव, आपण आपले वचन पूर्ण केले. ‘आम्ही आपण दिलेले ध्येय पूर्ण करू शकू’, यासाठी आम्हाला भक्तीभाव द्या. आम्ही आपल्या चरणी शरण आलो आहोत.’

– एक साधिका (१४.९.२०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक