श्रीरंगपट्टणम (कर्नाटक) येथील अंजनेय मंदिर पाडून टीपू सुलतानने जामा मशीद बांधली !

पुरातत्व विभागाच्या वर्ष १९३५ अहवालातील माहिती !

नवी देहली – कर्नाटकचे मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण शहरातील जामा मशीद ही पूर्वीचे अंजनेय मंदिर होते. टिपू सुलतान याने ते तोडून मंदिराच्या अवशेषांचा वापर करून  तेथे मशीद बांधली, असा अहवाल मैसुरू पुरातत्व विभागाने वर्ष १९३५ मध्येच दिला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.

या जामा मशिदीचे नूतनीकरण चालू असतांना या मंदिराचे अवशेष दिसून आल्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या तक्रारीनंतर मशिदीचे काम थांबवण्यात आले आहे. या मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणीही हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • स्वतः पुरातत्व विभागानेच हे सत्य फार वर्षांपूर्वी नोंदवू ठेवले असेल, तर हे स्थळ हिंदूंकडे सोपवण्यास काय अडचण आहे ?
  • मागील काही दिवस हिंदू हा मंदिराचा इतिहास सांगून ते मिळण्यासाठी वैध मार्गाने लढा देत आहेत. पुरातत्व विभागाने मात्र मागील ८७ वर्षे हे सत्य ठाऊक असूनही विभागातील कुणीही हा सत्य इतिहास सांगण्यास पुढे आल्याचे ऐकिवात नाही. असा हिंदुद्वेषी विभाग विसर्जित करा !