सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दर्ग्यात( मुसलमान संतांचे थडगे)श्री गणपतीची आरती !

पुणे – येरवडा पोलीस ठाणे, पुणे पोलीस आयुक्तालय आणि शाहदावल बाबा दर्गा कमिटी यांच्या वतीने येथील शाहदावल दर्ग्यामध्ये सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली आरती भजन, कीर्तने, वासंतिक ओटी पूजा आणि रोजा इफ्तार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली दर्ग्यामध्ये आरती करणारे उद्या मंदिरातूनही अजान देण्यास भाग पाडतील, हे हिंदूंंनी लक्षात घ्यावे आणि अशा कार्यक्रमांना संघटितपणे विरोध करावा ! – संपादक) विशेष म्हणजे आरती करतांना श्री गणेशाची मूर्ती कुठेही दिसत नव्हती. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते बाबांच्या गादीसमोर गणपतीची आरती करण्यात आली.

असंख्य हिंदू आणि मुसलमान या कार्यक्रमाला उपस्थित होते. तेथे उपस्थित मुसलमानांनी ना आरती म्हटली, ना टाळ्या वाजवल्या. (यावरून सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूंसाठी आहे, हेच यावरून लक्षात येते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

असले सर्वधर्मसमभावाचे कार्यक्रम करण्यापेक्षा पोलिसांनी हिंदूंवर अन्य  धर्मियांकडून अन्याय होतो, तेव्हा हिंदूंना न्याय मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, तर तो खरा सर्वधर्मसमभाव ठरेल !