मोरबी (गुजरात) येथे श्री हनुमानाच्या १०८ फूट उंच मूर्तीचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण

देशाच्या चारही दिशांना श्री हनुमानाची मूर्ती बसवणार !

मोरबी (गुजरात) – येथे हनुमान जयंतीच्या दिवशी श्री हनुमानाच्या १०८ फूट उंच मूर्तीचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, श्री हनुमानाशी संबंधित चारधाम प्रकल्पांतर्गत, श्री हनुमानाच्या मूर्ती देशाच्या चारही दिशांना स्थापित केल्या जाणार आहेत. यांपैकी श्री हनुमानाची ही दुसरी मूर्ती आहे, जी पश्‍चिम दिशेला आहे.


मोरबी येथील बापू केशवानंद आश्रमात या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलीे. या शृंखलेतील पहिली मूर्ती उत्तरेकडील शिमला येथे वर्ष २०१० मध्ये बसवण्यात आली आहे. तिसर्‍या मूर्तीचे काम चालू आहे. तिसरी मूर्ती दक्षिणेला रामेश्‍वरम् येथे स्थापन करण्यात येणार आहे.