असे प्रकार रोखण्यासाठी देशपातळीवर गोवंश हत्याबंदी कायदा करणेच आवश्यक आहे. केंद्र सरकार यासाठी पावले उचलणार का ? – संपादक
कठूमर (राजस्थान) – तीन वाहनांत ५३ गोवंशियांना क्रूरपणे कोंबून त्यांची वाहतूक करणार्या तिघा धर्मांधांना खेडली कस्बा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकहून २ पिकअप वाहने आणि एक ट्रक हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रामकिशन बेरवा यांनी दिली. या गोवंशियांमध्ये गायी, म्हैस आदींचा समावेश होता. पोलिसांनी रस्त्यात तपासणीसाठी ही वाहने थांबवली असता हा प्रकार उघड झाला. गोवंशियांना मुक्त करण्यात आले असल्याचेही बेरवा यांनी सांगितले.