दंगलीच्या दोन वर्षांनंतरही राजधानी देहलीतील धर्मांधबहूल भागांतून हिंदूंचे पलायन चालूच !

फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या हिंदूविरोधी दंगलींमुळे हिंदू आजही भयाच्या सावटाखाली !

  • देशाच्या राजधानीतच हिंदूंची अशी दैना असेल, तर अन्य भागांतील हिंदूंच्या स्थिती कशी असेल ?, याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक
  • हिंदूबहुल भारतातील हिंदूंची ही दुःस्थिती १०० कोटी हिंदूंना लज्जास्पद ! यावरून देहलीत धर्मांध राज्य करतात कि सरकार ? असा प्रश्‍न पडतो ! – संपादक
  • हिजाब घालण्यास मज्जाव केल्यावर धर्मांधांच्या बाजूने गळे काढणारे काँग्रेसी, डावे, साम्यवादी, पुरो(अधो)गामी हिंदूंच्या या भयानक स्थितीविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • हिंदूबहुल भागांत धर्मांधांना घर नाकारल्यावर हिंदूंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारे आता धर्मांधांच्या या मुजोरीविषयी काही बोलतील का ? – संपादक
  • हिंदूंच्या या स्थितीवरून हिंदूंना कुणीही वाली नाही, हेच स्पष्ट होते ! हिंदूंना खर्‍या अर्थाने राजाश्रय हवा असेल, तर त्यांनी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अनिवार्य आहे ! – संपादक

नवी देहली – नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी कायदा यांच्याविरोधात देहलीमध्ये फेब्रुवारी २०२० मध्ये धर्मांधांनी दंगली घडवल्या होत्या. धर्मांधबहूल भागांमध्ये झालेल्या या दंगलींमध्ये एकूण ५३ लोकांना जीव गमवावा लागला होता, तर ७०० हून अधिक लोक घायाळ झाले होते. या भागांत रहाणार्‍या हिंदूंच्या मनावर आज दोन वर्षांनंतरही अत्याचारांच्या जखमा ताज्या आहेत. आजही या भागांतून त्यांचे पलायन चालूच आहे.

यावर पोलिसांचे साहाय्य घेण्यासाठी पीडित हिंदु कुटुंबांनी एका ‘पोलीस सार्वजनिक बैठकी’चे आयोजन केले होते. पूर्वोत्तर देहलीचे पोलीस उपायुक्त संजय सेन यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. बैठकीत पीडित हिंदु कुटुंबांनी त्यांना पलायन करण्यास भाग पाडणारी कारणे कथन केली. यावर पोलीस उपायुक्त सेन यांनी हिंदूंना आश्‍वस्त केले की, त्यांची समस्या सोडवण्यासाठी एका अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच ‘दुसर्‍या समाजा’तील लोकांशीही या समस्येवर चर्चा केली जात आहे. (‘दुसरा समाज’ म्हणजे कोण, हे पोलिसांनी स्पष्ट केले पाहिजे ! – संपादक) २ वर्षांपूर्वी झालेल्या दंगलींसंदर्भात देहली उच्च न्यायालयाने सांगितले होते की, या दंगली अचानक झाल्या नसून ते एक पूर्वनियोजित षड्यंत्र होते.