झारखंड, बंगाल आणि पूर्वाेत्तर भारत येथील जिज्ञासूंसाठी विशेष ‘ऑनलाईन’ सत्संग आणि सामूहिक नामजप पार पडला !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त विशेष आयोजन

धनबाद (झारखंड) – भारतामध्ये विविध सण आणि उत्सव त्यांमागील शास्त्र जाणून घेऊन ते साजरे केले, तर त्यांचा आपल्याला अधिक प्रमाणात आध्यात्मिक लाभ मिळू शकतो. या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १३ जानेवारी २०२२ या दिवशी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने विशेष ‘ऑनलाईन’ सत्संग आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा लाभ झारखंड, बंगाल आणि पूर्वाेत्तर भारत येथील अनेक जिज्ञासूंनी घेतला.

या वेळी समितीच्या कु. नंदिता अग्रवाल यांनी उपस्थितांना आपत्काळामध्ये मकरसंक्रांत हा सण कसा साजरा करावा ? त्याचे महत्त्व काय ? हा सण साजरा करण्याची योग्य पद्धती कोणती ? या दिवशी काळे वस्त्र धारण करण्यामागील कारण इत्यादीविषयी शास्त्रीय माहिती सांगितली. तसेच या वेळी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. सत्संगाच्या शेवटी जिज्ञासूंचे मकरसंक्रांतीशी संबंधित परंपरा आणि शास्त्र यासंदर्भात शंकानिरसन करण्यात आले.