मुंबई, २९ डिसेंबर (वार्ता.) – मुसलमान आणि ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचे कथित कारण पुढे करून प.पू. कालीचरण बाबा, समस्त हिंदु आघाडी संघटनेचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि त्यांचे बंधू नंदकिशोर एकबोटे, सामाजिक कार्यकर्ते दीपक नागपुरे, अकोला येथे प.पू. कालीचरण महाराज, राजस्थान येथील कॅप्टन दिगेंद्रकुमार, अशा एकूण ६ जणांवर पुणे येथील खडक पोलीस ठाण्यात २८ डिसेंबर या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक सोमनाथ ढगे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.
चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालीचरण महाराज, मिलिंद एकबोटेंसह सहा जणांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल https://t.co/NUmnpBcjSW
— LoksattaLive (@LoksattaLive) December 29, 2021
शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहून गुन्ह्याची नोंद !
१९ डिसेंबर या दिवशी पुणे येथील सर्व हिंदु संघटनांच्या वतीने रौप्यमहोत्सवी शिवप्रतापदिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजक मिलिंद एकबोटे होते. पोलिसांनी या कार्यक्रमाचा व्हिडिओ आणि ‘ऑडिओ क्लिप’ यांची पडताळणी करून हा गुन्हा नोंद केला आहे.
ठाणे येथील पोलीस ठाण्यात प.पू. कालीचरण महाराज यांच्या विरोधात जितेंद्र आव्हाड यांची तक्रार !
महात्मा गांधी को गाली देने वाले कालीचरण महाराज की बढ़ी मुश्किलें, मंत्री जितेंद्र आव्हाड ने दर्ज कराया मामला #maharashtra #nathuramgodse #thane #महाराष्ट्र #महात्मागांधी https://t.co/wl9YaKBuFl
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) December 29, 2021
छत्तीसगडमधील धर्मसंसदेत मोहनदास गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि राष्ट्रभक्त नथुराम गोडसे यांना नमन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प.पू. कालीचरण महाराज यांच्या विरोधात २९ डिसेंबर या दिवशी ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांनी याविषयी ट्वीट केले आहे.