‘हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. असे होणे हे हिंदूंच्या विरोधातील एक षड्यंत्रच आहे. विविध नियतकालिके, सामाजिक माध्यमे, दूरचित्रवाहिन्या आदी व्यासपिठांवरून हिंदूंची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. याविषयी हिंदूंनी जागृत राहून या वैचारिक आतंकवादाला तेजस्वी विचारांनी प्रत्युत्तर दिले पाहिजे.’
१. वैचारिक आतंकवादाची उदाहरणे
१ इ. गोमाता : जेव्हा आम्ही म्हणतो की, गाय हा आमच्या भावनेचा प्रश्न आहे. गोपालन आणि गायींचे रक्षण यांविषयी राज्यघटनेत लिहिलेले आहे. तेव्हा विरोधक म्हणतात की, गाय हा भावनेचा नाही, तर पोटाचा प्रश्न आहे; कारण गोमांस हे स्वस्तात मिळणारे ‘प्रोटीन’ आहे. ते म्हणतात की, शेतकर्यांना भाकड गायी पोसायला लावणे, हा त्यांच्यावरील अन्याय आहे; पण शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवण्यास विरोधक कधीच जात नाहीत.
१ ई. एक राष्ट्र : जेव्हा आम्ही म्हणत होतो की, हे एक राष्ट्र आहे आणि त्याची फाळणी होऊ नये. तेव्हा विरोधक म्हणत होते, ‘नाही. हे एक राष्ट्र नाही. हा अनेक संस्थाने, भाषा आणि संस्कृती असणार्या लोकांचा घोळका आहे. याची धर्मनिहाय फाळणी होऊन मुसलमानांना त्यांचे राष्ट्र मिळाले पाहिजे.’ जेव्हा मुसलमान तिकडे गेले, तेव्हा ‘हे हिंदु राष्ट्र्र झाले पाहिजे’, असे आम्ही म्हणतो, तेव्हा ते म्हणतात की, नाही. हे असे राष्ट्र आहे की, ज्याची संस्कृती सर्वसमावेशक आणि समानतेची आहे. हे एक राष्ट्र आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राची मागणी करणे चुकीचे आहे.
(क्रमश: पुढच्या रविवारी)
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद (मे २०२१)