|
रांची (झारखंड) – खूंटी जिल्ह्यामध्ये धर्मांधांनी क्षुल्लक कारणांवरून ४५ वर्षीय पंकज चौधरी यांची हत्या केली. गंभीर घायाळ झालेले चौधरी यांना आधी तोपरा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. त्यानंतर त्यांना रांची येथील रिम्स रुग्णालयात हालवण्यात आले; मात्र उपचाराच्या वेळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चौधरी यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून इश्तियाक मियाँ उपाख्य ताजो, नाझिर अंसारी आणि सुहैल आलम यांना अटक करण्यात आली.
चौधरी हे सुतारकाम करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ते त्यांच्या कुटुंबासमवेत तपकारा मशिदीच्या बाजूला रहात होते. त्यांची दोन्ही मुले गतीमंद आहेत. धर्मांधांनी चौधरी यांना मेलाटांड भागात बोलावून जबर मारहाण केली. पोलीस ठाण्यापासून केवळ ५० मीटर अंतरावर ही घटना घडली. (यावरून धर्मांधांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसून येते ! – संपादक) चौधरी यांची हत्या झाल्याची माहिती समजताच गावात तणाव निर्माण झाला. जमावाने तपकरा पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन केले. भाजपचे आमदार कोचे मुंडा यांच्या उपस्थितीत अधिकार्यांनी चौधरी यांच्या कुटुंबाला २० सहस्र रुपयांचे सहाय्य केले. आमदार मुंडा यांनी ‘पोलिसांनी या प्रकरणाचे निष्पक्ष अन्वेषण करावे’, अशी मागणी केली. (आमदाराला पोलिसांकडे अशी मागणी करावी लागते, हे लज्जास्पद ! – संपादक)