चीनने तैवानवर नियंत्रण मिळवल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील ! – तैवानची चेतावणी

छोटासा तैवानही चीनला थेट चेतावणी देतो, तर अण्वस्त्रसज्ज भारत ‘ब्र’ही काढत नाही, हे लज्जास्पद ! – संपादक

तैवानचे राष्ट्रपती साई इंग-वेन

तैपई (तैवान) – चीनने तैवानवर नियंत्रण मिळवल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. आशिया खंडात याची गंभीर आणि विनाशकारी प्रतिक्रिया दिसून येईल. तैवानला युद्ध नको आहे; मात्र स्वसंरक्षणासाठी सर्व मार्ग वापरण्यास तैवान सज्ज आहे, अशा शब्दांत तैवानने चीनला चेतावणी दिली आहे. तैवानचे राष्ट्रपती साई इंग-वेन यांनी एका परराष्ट्र धोरणविषयक नियतकालिकात एक लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी ही चेतावणी दिली आहे.

१. मागील काही दिवसांमध्ये चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई सीमेमध्ये घुसखोरी केली असल्याचे समोर आले. १ ऑक्टोबर या दिवशी चीनने राष्ट्रीय दिवस साजरा करतांना सैन्याचे शक्तीप्रदर्शन केले. चीनच्या वायू दलाने तैवानच्या हवाई सीमेमध्ये ३८ लढाऊ विमाने घुसवली होती. यावर तैवानने संताप व्यक्त केला आहे.

२. चीनकडून तैवानवर सातत्याने दबाव टाकला जात आहे. तैवान स्वत:ला एक स्वतंत्र देश म्हणून जगाला ओळख करून देतो, तर चीनकडून हा आमचाच भूभाग असल्याचा दावा करण्यात येतो. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनीदेखील ‘तैवान हा लवकरच चीनचा भूभाग होईल’, असे म्हटले होते.