फोंडा येथील जामिया मकबोलीया विद्यालयात विद्यार्थिनींचा विनयभंग : दोषींवर कारवाईची मागणी

‘मडगाव गोंयचे महिला एकवट’ संघटनेची शिक्षण खात्याकडे तक्रार

  • अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना हे लज्जास्पद ! – संपादक 
  • अशाने महिलांच्या सुरक्षिततेविषयी जनमानसात प्रश्‍नचिन्ह निर्माण होणे साहजिकच आहे ! – संपादक 
  • गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. सावंत याची नोंद घेतील का ? – संपादक 
प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, १७ ऑगस्ट (वार्ता.) – फोंडा येथील जामिया मकबोलीया विद्यालयात वर्ष २०१८ मध्ये इयत्ता तिसरी आणि चौथी मधील एकूण ४ विद्यार्थिनींचा विनयभंग झाला आहे आणि या प्रकरणी दोषीवर कारवाई करण्याची मागणी ‘मडगाव गोंयचेे महिला एकवट’ संघटनेने शिक्षण खात्याकडे एका तक्रारीद्वारे केली आहे.

शिक्षण खात्याकडे तक्रार करण्यासाठी आलेल्या असतांना मडगाव गोंयचेेे महिला एकवट’ संघटनेच्या साजिदा जकाती प्रसारमाध्यमांना म्हणाल्या, ‘‘जामिया मकबोलीया विद्यालयात वर्ष २०१८ मध्ये इयत्ता तिसरी आणि चौथी मधील एकूण ४ विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आला आहे. विद्यालयातील एका व्यक्तीने विद्यार्थिनींचे कपडे काढून त्यांचा विनयभंग केला. विद्यालयातील एका कर्मचार्‍याने याचे चित्रीकरण केले. त्यानंतर याविषयी फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आणि घटनेचा फोंडा पोलीस ठाण्यात प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंद करण्यात आला; मात्र दोषींवर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. याउलट तक्रार करणार्‍या आणि घटनेचे चित्रीकरण करणार्‍या व्यक्तीला वर्ष २०१९ मध्ये धमकी देण्यात आली. यामुळे तक्रारदार उघडपणे याविषयी बोलत नव्हता. त्यानंतर वर्ष २०२० मध्ये दळणवळण बंदी लागू झाल्याने विद्यालय बंद होते. आता विद्यालय पुन्हा चालू होण्याच्या स्थितीत असल्याने अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधित तक्रारदाराने ‘मडगाव गोंयचे महिला एकवट’ या संघटनेशी संपर्क साधून सत्यस्थिती सांगितली. तक्रारदार म्हणाला, ‘‘मी मुसलमान आहे आणि आरोपीही त्याच धर्माचा आहे. ही घटना आपल्या धर्मासाठी लज्जास्पद आहे. हा प्रकार सहन न झाल्याने आणि दोषींवर कारवाई होणे आवश्यक असल्याने आम्ही आता पुढे सरसावलो आहोत. विद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना महिला कर्मचार्‍यांनी हाताळणे अपेक्षित होते, तर तेथे पुरुष कर्मचार्‍यांचे काय काम ?’’