गौरवल्या गेलेल्या सर्व पोलिसांचे अभिनंदन !
मुंबई – यावर्षी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ घोषित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. पोलिसांना त्यांच्या प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम्) घोषित झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ७४ पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना पदके मिळाली आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे हेडकॉन्स्टेबल सुनील काळे यांना मरणोत्तर शौर्य पदक श्रेणीतील ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ मिळाले आहे.
सेवा पदक श्रेणीत महाराष्ट्राला एकूण तीन ‘राष्ट्रपती पोलीस पदके’ मिळाली आहेत. यामध्ये स्टेट इंटेलिजन्स विभाग, मुंबईचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि आयुक्त आशुतोष डंबरे, ओझर एअरपोर्ट सुरक्षा, नाशिक ग्रामीणचे पोलीस उपायुक्त अशोक उत्तम अहिरे, यवतमाळ येथील पोलीस उपनिरीक्षक विनोदकुमार लल्ताप्रसाद तिवारी यांचा समावेश आहे. राज्यातील एकूण २५ पोलिसांना पोलीस शौर्य पदके मिळाली आहेत.