समष्टी साधना शिकण्याचा प्रयत्न, हाच युवकांच्या वेळेचा खरा सदुपयोग ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

युवकांसाठी ‘ऑनलाईन’ संपर्क कार्यशाळेचे आयोजन

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

देहली – आजची युवा पिढी दूरचित्रवाहिनी आणि भ्रमणभाष यांच्यामध्ये व्यस्त असतांना युवकांनी कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन समष्टी सेवा शिकण्याचा प्रयत्न करणे, हे कौतुकास्पद असून हाच वेळेचा खरा सदुपयोग आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. साधनेसाठी प्रयत्नरत युवकांसाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच एका ‘ऑनलाईन’ संपर्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यशाळेचा लाभ देहली, एन्.सी.आर्., हरियाणा, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील अनेक युवकांनी घेतला.

‘गुरुपौर्णिमेनिमित्त संपर्क कसा करावा ?’, याविषयी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी माहिती दिली. तसेच ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ या विषयावर समितीच्या कु. पूनम चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

क्षणचित्र

कार्यशाळेमध्ये प्रायोगिक सत्राच्या माध्यमातून शिबिरार्थींना संपर्क करण्याचा विषय समजावून सांगण्यात आला. यात सर्वजण उत्साहाने सहभागी झाले.