सावंतवाडी शहरातील गांजा विक्रीच्या प्रकरणी आतापर्यंत ५ जणांना अटक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सावंतवाडी – शहरातील गांजा विक्रीच्या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी ३० जुलैला रात्री आणखी एका संशयिताला कह्यात घेतले. संकेत उपाख्य सनी महेंद्रकर असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून १६ ग्रॅम गांजा कह्यात घेण्यात आला. यामुळे या प्रकरणातील आरोपींची एकूण संख्या ५ झाली आहे. यापूर्वी अटक केलेल्या बॉबी उपाख्य फैजल बेग याने महेंद्रकर याच्याकडून गांजा आणत असल्याची माहिती पोलिसांना माहिती दिली होती. महेंद्रकर याच्या शोधासाठी कुडाळ पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले; मात्र तो पसार झाला होता. अखेर ३० जुलैला रात्री महेंद्रकर कणकवलीहून कुडाळच्या दिशेने येणार असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक केली.