नगर, ३० जुलै – येथील लसीकरण केंद्राबाहेर भाजपचे खासदार सुजय विखे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या फ्लेक्सविषयी तक्रार आल्याने महापालिकेने त्यावर कारवाई चालू केली; परंतु वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप झाल्यानंतर ती कारवाई थांबवण्यात आली आहे.
शहरात फ्लेक्ससंबंधीचे नियम न्यायालयाच्या आदेशानंतर कठोर करण्यात आलेले आहेत. यासाठी महापालिकेने व्यावसायिक वापरासाठी जे होर्डिंग्ज दिले आहेत, तेथेच अशी सशुल्क अनुमती आहे; मात्र भाजपला हे फ्लेक्स लसीकरण केंद्राबाहेरच हवे आहेत. त्यामुळे तेथे अनुमती कशी द्यायची ? असा प्रश्न तर आहेच. शिवाय उरलेले फ्लेक्स कसे काढायचे ? हाही पेच महापालिकेपुढे निर्माण झाला आहे. यासंबंधी आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले की, या फलकांना महापालिकेची अनुमती नसल्याने ते काढण्याचे काम चालू केले होते.