प्रार्थना करतो आम्ही शनिदेवा ।

‘हे शनिदेवा, मी हे लिखाण प्रार्थना आणि आरती या स्वरूपात केले आहे. माझ्याकडून चूक झाल्यास बोबडे बोल समजून क्षमा करावी.

श्री. सुधाकर जोशी

जयदेव जयदेव जय शनिदेवा ।
हात जोडूनी प्रार्थना करतो तुजला देवा ।
जयदेव जयदेव जय शनिदेवा ।। धृ. ।।

काही क्षणांसाठी गुरूंच्या(टीप १) राशीला आले ।
एवढ्या मोठ्या संकटात टाकीयले ।। १ ।।

परात्पर गुरुदेवांवरील अरिष्ट टळू दे रे (टीप २) ।
गुरुदेवांना दीर्घायुष्य लाभू दे रे ।। २ ।।

हिंदु धर्मासाठी झाला त्यांचा अवतार ।
तुझी कृपादृष्टी त्यांना सतत लाभू दे रे ।। ३ ।।

तुझा हात त्यांच्या मस्तकी राहू दे रे ।
आता सत्वरी ‘हिंदु राष्ट्र’ येऊ दे रे ।। ४ ।।

टीप १ : नवग्रह पोथीमधले गुरु

टीप २ : शनिदेव त्यांच्या गुरूंच्या राशीला आल्यावर त्यांच्या गुरूंना त्रास भोगावा लागला. तसा त्रास आमचे गुरु परात्पर गुरु डॉक्टर यांना होऊ नये.’

– श्री. सुधाकर केशव जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.२.२०२०)