१. आनंदी
‘सौ. अरुणा स्वतः आनंदी राहून इतरांनाही वेगवेगळे प्रसंग सांगून आनंदी करते. तिच्या सहवासात आनंद मिळतो.
२. गुरुमाऊलींच्या कृपेने सौ. अरुणा तावडे हिच्याशी आध्यात्मिक मैत्री होऊन तिचे साधनेत साहाय्य होणे
बालवाडीपासून १२ वीपर्यंत माझी कु. अरुणा चिमुलकर या मैत्रिणीशी व्यावहारिक मैत्री होती. आता अध्यात्मात गुरुमाऊलींच्या कृपेने माझी सौ. अरुणा तावडे हिच्याशी आध्यात्मिक मैत्री झाली आहे. ‘सख्ख्या मैत्रिणी आणि जणू सख्ख्या बहिणी’, असल्याप्रमाणे आम्हा दोघींचे चांगले जुळते. आमच्यात क्वचितच मतभेद झाले असतील ! मी तिला माझ्या जीवनातील घटनांविषयी मनमोकळेपणाने सांगू शकते. माझ्यापेक्षा तिचाच माझ्या प्रकृतीविषयी अधिक अभ्यास आहे. ती प्रसंगानुरूप मला उपाययोजनाही सांगते. ती माझ्याकडून झालेल्या चुका, माझ्यातील स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांची मला जाणीव करून देते.
३. प्रेमभाव
अरुणा म्हणजे प्रेमाचा धबधबा आहे. तिच्या प्रत्येक कृतीतून प्रेमभाव अनुभवायला मिळतो. ती दिवाळीला घरी गेल्यावर आश्रमात येतांना साधकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ करून आणते. ती साधकांना सर्वतोपरी साहाय्य करते.
४. सेवेप्रती भाव
अरुणा कुठलीही आश्रमसेवा लगेच स्वीकारते. कधी शारीरिक त्रास झाला किंवा रात्री जागरण झाले असले, तरी ती सकाळी आश्रमसेवेसाठी सिद्ध असते.
५. साधकांना आधार देणे
प्रत्येक प्रसंगात तिचा इतरांना समजून घेण्याचा भाग असतो. ती प्रत्येक प्रसंगात सकारात्मक रहाते आणि ‘साधकांच्या मनाची स्थिती कशी आहे ?’, याचा अभ्यास करते. ती साधकांच्या अडचणींचा खोलवर अभ्यास करते आणि त्यांना आधार देऊन त्यांच्या अडचणी सोडवते. त्यामुळे सर्वांना तिचा आधार वाटतो.
६. सहसाधकांना सेवेत पारंगत करणे
मी ग्रंथांशी संबंधित सेवा करू लागल्यावर अरुणाने मला ‘संगणकीय पत्र पाठवणे, धारिकांचे वेगवेगळ्या पद्धतींनी वर्गीकरण करणे, धारिका संकलनाला देणे, संकलन करून आल्यावर त्या पुढे पडताळायला देणे आणि संकलनाचा समन्वय करणे’, अशा वेगवेगळ्या सेवा शिकवल्या.
७. गुरुंप्रती कृतज्ञताभाव
तिचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ भाव आहे. तिला गुरुमाऊलीची (परात्पर गुरु डॉक्टरांची) आठवण आल्यावर तिचे डोळे कृतज्ञतेने भरून येतात.
गुरुमाऊली, तुम्हीच अरुणाची आध्यात्मिक प्रगती करवून घेतली आणि आम्हा सर्वांना तिच्या प्रगतीचा आनंद अनुभवायला दिलात. ‘तिचे गुण आमच्यामध्ये येऊ देत आणि तिची पुढची प्रगती जलद गतीने होऊ दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना करून कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. सुषमा पेडणेकर (आताच्या सौ. सुषमा नाईक), आध्यात्मिक पातळी ६२ टक्के. सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.७.२०२०)