गूगलने ‘पराजित’ या शब्दाचा अर्थ देतांना हळदीघाटीमधील युद्धात अकबराने महाराणा प्रताप यांना पराभूत केल्याचा दिला खोटा संदर्भ !

जाणीवपूर्वक खोटा संदर्भ देऊन हिंदूंचा तेजस्वी इतिहास दडपण्याचे षड्यंत्र !

गूगलचा हिंदुद्वेष ! याविषयी इतिहासप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांनी ‘गूगल’ला खडसावून त्याला योग्य संदर्भ देण्यासाठी भाग पाडले पाहिजे !

मुंबई, २८ जुलै (वार्ता.) – ‘गूगल’ या ‘सर्चइंजिन’वर ‘पराजित का अर्थ’ असे शोधल्यास ‘हराया हुआ’ असा अर्थ दिला जातो. त्यापुढे कंसात ‘जैसे – अंततोगत्वा अकबर ने हल्दीघाटी के युद्ध में राणा प्रताप को पराजित कर दिया ।’, (मराठी अर्थ : ‘जसे – शेवटी अकबराने हळदीघाटीच्या युद्धात राणा प्रताप यांना पराजित केले’) असा चुकीचा आणि संतापजनक संदर्भ दिला असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे ‘गूगल’ वर अन्य शब्दांचे संदर्भ न देता केवळ अर्थ दिलेले असतांना ‘पराजित’ या शब्दाचा अर्थ देतांना मात्र अकबराकडून महाराणा प्रताप यांचा पराभव झाल्याचा खोटा संदर्भ आवर्जून देण्यात आला आहे. यातून हिंदुद्वेष्ट्यांकडून जाणीवपूर्वक हिंदूंच्या संदर्भात खोटा इतिहास पसरवून, तसेच हिंदूंचा तेजस्वी इतिहास दडपून हिंदूंचे खच्चीकरण करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचे उघड होत आहे.

काय आहे इतिहास ?

१. मेवाड कह्यात घेण्यासाठी अकबर याने राजा मानसिंह याच्या नेतृत्वाखाली मेवाडवर आक्रमण केले. त्या वेळी महाराणा प्रताप यांच्या नेतृत्वाखाली राजपूत, तर राजा मानसिंह याच्या नेतृत्वाखालील अकबराचे सैन्य यांच्यात घनघोर युद्ध झाले.

२. मोगलांच्या अफाट सैन्याच्या तुलनेत राजपुतांचे सैन्य अल्प असल्यामुळे महाराणा प्रताप यांनी गनिमी काव्याने लढा दिला. या युद्धात महाराणा प्रताप यांना भिल्लांनी साहाय्य केले. युद्धात महाराणा प्रताप हाती न लागल्यामुळे राजा मानसिंह याला हात हलवत देहलीत परत जावे लागले.

३. एवढे मोठे सैन्यबळ पाठवूनही मेवाड हाती न आल्याच्या रागातून अकबराने काही दिवस त्याच्या दरबारात राजा मानसिंह यांना प्रवेशबंदी केली होती. असे असतांना अकबराच्या दरबारातील भाट आणि मोगल इतिहासकार यांनी हळदीघाटातील युद्धामध्ये अकबराचा उदो उदो केला आहे. हा संदर्भ देत डाव्या विचारसरणीच्या काही लेखकांकडून हळदीघाटातील युद्धात अकबराच्या सैनिकांनी महाराणा प्रताप यांचा पराभव केल्याचे खोटे लिखाण आणि त्याचा प्रचार करण्यात येत आहे.

इतिहासप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांनो, ‘गूगल’वरून चुकीचा इतिहास हटवण्यासाठी पुढील कृती करा !

प्रथम ‘गूगल’ वर ‘पराजित का अर्थ’ असे टंकलिखित करा, तसे केल्यावर चुकीचा संदर्भ दाखवला जाईल. तो हटवण्यासाठी पुढील कृती करा…

१. त्याखाली असलेल्या ‘फीडबॅक’ (Feedback) या शब्दावर ‘क्लिक’ करा.

२. त्यानंतर ‘तुम्हाला काय वाटते ?’ (What do you think ?) या मथळ्याखाली दिलेला चौथ्या क्रमांकाचा ‘परिभाषा चुकीची आहे’ (A Definition is wrong) हा पर्याय निवडा.

३. त्याखाली ‘टिपण्या किंवा सूचना’ (Comments or suggestions) या पर्यायामध्ये ‘अंततोगत्वा (शेवटी) महाराणा प्रताप ने हल्दीघाटी के युद्ध में अकबर को पराजित कर दिया’, असा किंवा स्वतःच्या भाषेत योग्य इतिहास नमूद करावा.