वापी (गुजरात) येथील धर्मांतरित २१ ख्रिस्ती कुटुंबांचा हिंदु धर्मात प्रवेश !

आमीष दाखवण्यात आल्यामुळे खिस्ती धर्म स्वीकारला होता !

संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा बनवला जात नाही, तोपर्यंत हिंदूंचे धर्मांतर रोखले जाऊ शकणार नाही, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा कायदा लवकरात लवकर बनवावा, असेच हिंदूंना वाटते !

ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या २१ कुटुंबांनी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला.

वापी (गुजरात) – येथील धर्मपूर आणि कपराडा येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या २१ कुटुंबांनी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला. विश्‍व हिंदु परिषदेच्या प्रयत्नातून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणण्यात आले. आमीष दाखवण्यात आल्याने या कुटुंबांनी धर्मांतर केले होते. ५ वर्षांपूर्वी त्यांचे धर्मांतर करण्यात आले होते; मात्र त्यांच्या समस्या सुटल्या नव्हत्या. (याचा अर्थ धर्मांतर करून प्रश्‍न सुटत नाहीत, हे हिंदु धर्माचा त्याग करू पहाणार्‍यांनी लक्षात ठेवावे ! – संपादक)