‘राम’ तिथे सदा ‘जय’ म्हणूनी नाम असे ‘जयराम’ ।

पू. जयराम जोशी

माता-पित्याने ठेवले अर्थपूर्ण नाव ।
‘राम’ तिथे सदा ‘जय’ (विजय) ।
म्हणूनी नाम असे ‘जयराम’ (टीप १) ।। १ ।।

श्री. संजय घाटगे

‘गुरुदेव’ (टीप २) म्हणजे साक्षात् ‘राम’ । असा अंतर्यामी त्यांचा ‘भाव’ ।
म्हणून नावामधूनी साधला । गुरुदेवांचा जयजयकार ।। २ ।।

सात्त्विक मूर्ती, जणू वामनावतार ।
गुरुकार्याच्या वृद्धीसाठी निवडले ।
‘मिरज आश्रम’ (टीप ३) हे धाम ।। ३ ।।

निखळ त्यांच्या हास्यामधून । होतो वारंवार गुरुदेवांचाच भास ।
देह जरी दोन, तरी आत्मा असे एकच । असे मज नित्यनेमाने वाटते खास ।। ४ ।।

द्वैत भाव नष्ट होऊनी । तेथे साक्षात् अद्वैतच साकारले ।
त्यामुळेच पू. आबा आम्हा सदा । गुरुस्वरूपच भासले ।। ५ ।।

‘जरी संत दिसती निराळे । परी ते स्वस्वरूपी मिळाले’ ।
याचे याहून सुंदर उदाहरण । दुसरे कोणते द्यावे बरे ? ।। ६ ।।

टीप १ – पू. जयराम जोशी

टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले

टीप ३ – पू. जयराम जोशी मिरज आश्रमात वास्तव्य करतात.

– श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, कोल्हापूर. (२९.३.२०२१)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक