सिंधुदुर्गात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्ह्यात २ ते ८ जुलै २०२१ या आठवड्यातील कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट -आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीच्या आधारे) १०.७ टक्के होते. त्यानंतर ९ ते १५ जुलै या आठवड्यात हे प्रमाण ७.४२ टक्के होते. हे प्रमाण सरासरी ९.०६ टक्के आहे. त्यामुळे कोरोनाच्या अनुषंगाने असलेल्या नियमांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश सध्या स्तर ३ मध्ये होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात २७ जुलै २०२१ या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत ‘स्तर ३’चे निर्बंध लागू आहेत, असा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिला आहे. कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक असल्याने जिल्हा आतापर्यंत ‘स्तर ४’ मध्ये होता.
जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे २५२ नवीन रुग्ण आढळले. सद्य:स्थितीत ३ सहस्र ९९ रुग्णांवर उपचार चालू आहेत. गेल्या २४ घंट्यांत ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४५ सहस्र ७९७ झाली आहे.