१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे’, यासाठी सनातनच्या संतांनी केलेली प्रार्थना अन् नामजप श्रीरामापर्यंत पोचणारच’, याची साधकाला असलेली निश्चिती
‘परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा’, यासाठी वर्ष २०२० मध्ये सनातनचे संत आणि साधक अन्य संतांनी सांगितल्याप्रमाणे श्रीरामाचा नामजप करत होते. ‘तो नामजप सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ किंवा पू. पृथ्वीराज हजारे यांच्या माध्यमातून श्रीरामापर्यंत निश्चितच पोचेल’, असे मला जाणवले. ते दोघेही काया, वाचा आणि मन यांद्वारे श्रीरामाचे शरणागतभावाने जे स्तवन करत होते, त्याला सीमाच नाही. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘परात्पर गुरुदेवांनी असे संत निर्माण केले आहेत की, हा संकल्प (रामराज्य आणण्याचा) पूर्ण होण्यात गुरुकृपेने या संतांचेही मोठे योगदान आहे. ही गुरुकृपा या संतांमधील दास्यभावामुळे त्यांच्यावर झाली आहे.’
२. सद्गुरु गाडगीळकाका आणि पू. हजारेकाका यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये
अ. सद्गुरु गाडगीळकाकांचा सातत्याने नामजप होत असतो. त्यांनी आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना नामजपादी उपाय सांगून उच्च कोटीची समष्टी साधना केली आहे. ते आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना त्रासातून मुक्त करण्यात निष्णात आहेत. त्यांना कसलीही उपाधी नको. ते स्वयंप्रेरणेने सेवा करतात. त्यांना अहं मुळीच शिवत नाही.
आ. सद्गुरु गाडगीळकाका आणि पू. हजारेकाका हे दोघेही गणाधिपतीस स्तवन करून सर्वांची प्रार्थना आणि नामजप श्रीरामाच्या चरणांपर्यंत पोचवतात. त्यांच्यात शोधूनही दोष सापडत नाहीत. परात्पर गुरु डॉ. आठवले सर्वांचे मंगल होण्यासाठी सर्वांवर गुरुकृपेचा वर्षाव करत आहेत.
इ. ‘जे अखंड परमार्थ जाणतात, ज्यांचे आचरण शुकमुनींसारखे आहे, जे पंचमहाभूतांचे चिंतन उत्तम रितीने करू शकतात आणि त्यांना पूर्णतः जाणतात, जे मितभाषी आहेत, ज्यांचा संकल्प अभेद्य असून तो परिपूर्ण करण्याची ज्यांच्यात क्षमता आहे, जे सत्पात्र, ज्ञानी आणि विनयशील आहेत, अशाच विभूती श्रीरामास आर्ततेने बोलावू शकतात.’ आमचा नामजप त्यांच्याच कृपेने सफल संपूर्ण होऊ शकतो. तेच रामराज्य आणण्यासाठी श्रीरामास आळवू शकतात. परात्पर गुरूंनी त्यासाठी या दोघांची केलेली निवड वेदश्रुतिसंमतच (अत्यंत योग्य) आहे.
३. सद्गुरु गाडगीळकाका आणि पू. हजारेकाका यांच्यातील सद्गुण !
अ. सत्य बोलणे, सदाचारी.
आ. संयम असणे, शांत रहाणे, अंतर्मुखता आणि षड्रिपूंवर मात करणे
इ. विश्वकल्याणासाठी अध्यात्मशास्त्राचा सखोल अभ्यास करणे
ई. ते जप करतांना त्यांची दृष्टी भ्रूमध्यावर असून ध्यान ईश्वराच्या (श्रीरामाच्या) चरणी असते. त्यांचे चक्षू सातत्याने उघडे असतात. त्यांची ध्यानमुद्रा असली, तरी ती क्षणभंगुर असते. ते ध्यानमुद्रेत राहून आणि पाठीचा कणा सरळ ठेवून श्रीरामाच्या चरणी लीन होतात. त्यामुळे ते श्रीरामास निश्चितच आवडतात.
३. या संतांच्या संकल्पामुळे साधकांचा जपही श्वासाला जोडून होतो. सर्व साधक अनुसंधानात; परंतु जागृत अवस्थेत असतात.
परात्पर गुरूंची हीच तर किमया आहे. ते या घोर कलियुगात (स्वतःच्या) अवतारत्वाचे अवलोकन करण्याचे कार्य संतांकडून करवून घेऊन साधकांची आध्यात्मिक उन्नती करवून घेतात. आम्हा सर्व साधकांचा परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु गाडगीळकाका आणि पू. हजारेकाका या सर्वांना शिरसाष्टांग नमस्कार.’
– डॉ. अजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(वर्ष २०२०)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |