‘फेब्रुवारी २०२१ पासून मी आजारपणामुळे दिवसभर अंथरुणावर पडून आहे आणि अधूनमधून झोपतो; म्हणून मला ग्रंथांशी संबंधित लिखाण संगणकावर वाचता येत नाही. त्यामुळे मला वाटायचे, ‘आता ग्रंथांची सेवा कशी होणार ?’ तेव्हा मी यापूर्वी जमा करून ठेवलेल्या लिखाणांच्या कात्रणांचे दिवसभर वाचन करणे चालू केले. तेव्हा ‘त्यातून मिळणार्या ज्ञानाचा आनंद संगणकावर वाचता येणार्या लिखाणाच्या आनंदापेक्षा पुष्कळ अधिक प्रमाणात मिळतो’, हे मला अनुभवता आले.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले