घरोघरी आयुर्वेद


आम्लपित्त, मूळव्याध, फिशर, शौचातून रक्त पडणे, पाळीच्या वेळी अधिक स्राव होणे, अल्सर्स, गर्भधारणा न होणे वा सतत गर्भपात यांसारख्या तक्रारी असणार्‍या व्यक्तींनी हिरवी वा लाल मिरची, ढोबळी मिरची यांचे सेवन पूर्णपणे थांबवावे. आयुर्वेदानुसार या गोष्टी विशेषतः धातूप्रदोषक मानता येतील. जलद, तीव्र आणि मोठ्या प्रमाणात धातुदुष्टी (शरिरातील रक्त, मांस, मेद आदी ७ घटकांचे संतुलन बिघडणे) घडवण्यात हे पदार्थ आघाडीवर आहेत.

​पूर्ण वर्ज्य याचा अर्थ ‘मुळीच न वापरणे.’ ‘भाजी शिजतांना मिरची घालतो, मग काढून टाकतो’, ही पळवाट इथे उपयोगी नाही. तिखटपणासाठी मिरपूड, सुंठ वा लाल तिखट पावडर वापरता येईल.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पती, डोंबिवली.