‘आयुर्वेद’ हा आयुष्याचा वेद आहे. रोगांपासून मुक्त होण्यासाठी आणि आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी ज्या ज्या द्रव्यांचा उपयोग होतो, ती सर्व द्रव्ये आयुर्वेदीय औषधांमध्ये अंतर्भूत आहेत, असा आयुर्वेदाचा विशाल दृष्टीकोन आहे. ‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदीय औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !
आयुर्वेदाची मूलतत्त्वे (वात-पित्त-कफ, प्रकृती आदींचे विवेचन !)
आयुर्वेदाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य मिळवता येते. आयुर्वेद हे ईश्वरनिर्मित शास्त्र आहे. त्यामुळे आयुर्वेदाची मूलतत्त्वे शाश्वत आणि चिरंतन आहेत. ही मूलतत्त्वे जाणून घेतली, तर या शास्त्राचे अध्ययन करणे, तसेच ते कृतीत आणणे सोपे जाते. या मूलतत्त्वांनुसार दैनंदिन जीवनात सर्वसामान्य व्यक्तीने आचरण ठेवल्यास तिचे जीवन आरोग्यसंपन्न अन् सुखी होण्यास मोठे साहाय्य होते.
आयुर्वेदानुसार दिनचर्येतील सकाळी उठण्यापासून व्यायामापर्यंतच्या कृती
- आरोग्यप्राप्तीसाठी नेहमी किती वाजता उठावे ?
- आयुर्वेदानुसार दात घासण्याची पद्धत कोणती ?
- डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी काय करावे ?
- नाकात तेलाचे थेंब घातल्याने काय लाभ होतो ?
- कानाचे विकार होऊ नयेत, यासाठी काय करावे ?
- नियमित अंगाला तेल चोळण्याचे लाभ कोणते ?
आयुर्वेदानुसार दिनचर्येतील स्नानापासून झोपेपर्यंतच्या कृती आणि ऋतूचर्या
- नेहमीच्या स्नानासाठीचे पाणी कसे असावे ?
- आयुर्वेदानुसार संभोग किती दिवसांनी करावा ?
- प्रतिदिन किती वेळ झोप घेणे आवश्यक असते ?
- ऋतूंनुसार शरिरामध्ये कोणते पालट होतात ?
- वसंत आदी ऋतूंत काय खावे व काय खाऊ नये ?
आहारशास्त्राची मूलतत्त्वे (आहाराविषयी आयुर्वेदीय आणि आध्यात्मिक दृष्टीकोन !)
- वास्तूशास्त्राच्या दृष्टीने स्वयंपाकघराची रचना
- सात्त्विक, राजसिक आणि तामसिक आहार
- पचायला हलके आणि जड अशा पदार्थांची सूची
- वात, पित्त आणि कफ या प्रकृतींनुसार आहार
- विरुद्ध आहाराची व्याख्या अन् त्याचे दुष्परिणाम
विकार आणि उपचार यांविषयी मूलभूत आयुर्वेदीय दृष्टीकोन
आयुर्वेदात एखाद्या रोगावर सर्वच व्यक्तींना एकसारखे उपचार नसतात. व्यक्तीच्या रोगाचे कारण, रुग्णाचे वय, प्रकृती, ती रहात असलेला प्रदेश, रोगाच्या अवस्था इत्यादी घटकांनुसार उपचार पालटतात. विकार आणि उपचार यांविषयीचे मूलभूत आयुर्वेदीय दृष्टीकोन समजून घेतल्यास प्रत्येक रोगाचे औषध वेगळे लक्षात ठेवावे लागत नाही आणि नवीन निर्माण झालेल्या रोगावर यशस्वीपणे उपचार करणेही सहज शक्य होते. प्रस्तुत ग्रंथात रोग आणि चिकित्सा यांच्यासंबंधीची आयुर्वेदीय मूलतत्त्वे सांगितलेली आहेत.