सात्त्विक आहार – शाकाहार !

शाकाहाराचे महत्त्व आणि श्रेष्ठत्व

(प्रतिकात्मक छायाचित्र)
  • ‘शाकाहारात पुरेशी प्रथिने (प्रोटीन्स) असतात.
  • शाकाहारी लोक चपळ, निरोगी आणि दीर्घायुषी असतात. जॉर्ज बर्नार्ड शॉ कडवे शाकाहारी होते. ते ९४ वर्षांपर्ंयत निरोगी जीवन जगले.
  • पश्‍चिमेकडील विख्यात व्यक्ती शाकाहारी होत्या. प्लेटो, सॉक्रेटिस, अ‍ॅरिस्टॉटल, रुसो, गोल्डस्मिथ, मिल्टन, न्यूटन, शेले, वॉल्टेअर, सीझर, वेजनेट, थोरो, टॉलस्टॉय, फील्ड मार्शल माँटगोमरी, हॅरी वीटक्राफ्ट, ब्रिगेडिअर ग्रॉफी, ट्रासी पोलिन, एंथोनी क्विनीज, माल्कम मुगेरीस, पीटर सेलर्स इत्यादी. या सर्वांचे सांगणे असे आहे की, माणूस शाकाहारावर पूर्ण जीवन निरामय जगू शकतो.
  • आधुनिक विज्ञानाने शाकाहाराचे श्रेष्ठत्व निरपवाद सिद्ध केले आहे.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी