विद्यार्थ्यांना शाळेत जेवणाच्या डब्यातून घरी बनवलेले पदार्थ आणण्यास सांगणे !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

‘जेव्हा शाळेची मधली सुट्टी होते, तेव्हा दुपारच्या जेवणाच्या संदर्भात गुरुकृपेने माझ्या मनात असा विचार आला, ‘आपण प्रतिदिन विद्यार्थ्यांसमवेतच आपले घरून आणलेले जेवण जेवायचे.’ मुलांमध्ये कुणी पाव किंवा बाहेरचा काही पदार्थ आणला असेल, तर मुले तो पदार्थ मला कौतुकाने खाण्यासाठी देत. मी त्यांना सांगितले, ‘तुमच्या आईने बनवलेले जेवणच मी घेईन. बाहेरचे पदार्थ खाण्याने आपले विचार बिघडतात.’ मुलांना ते पटले. तेव्हापासून सर्व मुले घरचा डबा आणतात आणि ‘माझ्या आईने बनवले आहे’, असे सांगून मला आनंदाने देतात.’

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), सनातन आश्रम, पनवेल.