‘विळीवर उजवा गुडघा वर घेऊन बसण्याच्या होणार्या मुद्रेतून जिवाच्या रजोगुणी विचारांच्या वेगावरही नियंत्रण राहून भाजी चिरणे, ही प्रक्रिया कुठल्याही त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होण्यापासून मुक्त रहाते. (यावरूनच पूर्वीच्या काळी स्त्रिया स्वतःतील रजोगुणी कार्यकारी शक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पूजा करतांना किंवा जेवायला बसतांनाही उजवा गुडघा पोटाशी घेऊन का बसत होत्या, त्याचे महत्त्व लक्षात येते. – संकलक) भाजी चिरतांना बसण्याच्या होणार्या मुद्रेतून नाभीस्थित पंचप्राण कार्यरत होऊन देहातील रजोगुणावर नियंत्रण रहाण्यास साहाय्य झाल्याने भाजी चिरतांना हाताच्या होणार्या तमोगुणी स्पर्शातून भाजी दूषित होण्याचे टाळता येते. यामुळे देहाच्या त्रिगुणात्मक त्या त्या स्तरांवरील अवयवांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या भाजीतील पोषक आणि पूरक नैसर्गिक सूक्ष्म रसबिजाचाही र्हास होत नाही.’
– एक विद्वान [श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २८.१०.२००७, सायं. ७.३४]
भाजी कशी चिरावी ?१. गोलाकार किंवा उभ्या आणि सरळ फोडी अशा स्वरूपातच भाजी चिरावी. यामुळे भाजी चिरण्याच्या प्रक्रियेतून निर्माण होणार्या रज-तमात्मक स्पंदनांची निर्मिती थांबते. २. सजीव (चेतना) असलेल्या हाताने मोडलेल्या भाजीमध्ये पंचतत्त्वे जास्त प्रमाणात येतात. विळीने आणि सुरीने चिरलेली भाजी ही कृत्रिम प्रकारे मोडलेली असते. |
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |