पू. बन्सीधर तावडेआजोबा यांच्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी काढलेले गौरवोद्गार !

दृढ श्रद्धा आणि धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले डिगस, सिंधुदुर्ग येथील पू. बन्सीधर तावडे !

पू. बन्सीधर तावडेआजोबा यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या निमित्ताने वर्ष २०१९ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढलेले गौरवोद्गार !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘अभ्यासू आणि जिज्ञासू वृत्ती असलेले डिगस, सिंधुदुर्ग येथील पू. बन्सीधर तावडे यांनी सनातनचे ग्रंथ, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’ यांच्या वाचनातून अध्यात्म समजून घेतले अन् ते त्वरित कृतीतही आणले. अध्यात्माची आवड असल्याने नाम, सत्संग, सेवा आणि तन, मन अन् धन यांचा त्याग अशा टप्प्यांनी त्यांनी साधनेची सर्व तत्त्वे अंगीकारली. या सर्व टप्प्यांतून साधना करतांना ‘सनातनचा एकही शब्द असत्य असू शकत नाही’, अशी श्रद्धा त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यांची ‘दृढ श्रद्धा’ हेच त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीचे गमक आहे.

पू. बन्सीधर तावडेआजोबा यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यात धर्मकार्याची अतीव तळमळ आहे. प्रकृती अस्वास्थ्य असल्याने ते आता प्रत्यक्ष प्रसारसेवा करू शकत नाहीत; पण त्यांच्या ध्यानी-मनी सतत सेवेचाच ध्यास असतो. ‘ईश्‍वरी राज्य स्थापन व्हावे’, याची त्यांना एवढी तळमळ लागली आहे की, ते सतत त्या चिंतनातच गढलेले असतात. या विषयावर ते उत्स्फूर्तपणे आणि अभ्यासूपणे बोलतात.

शारीरिक आजारपण असूनही ते सतत आनंदावस्थेत असतात. पू. तावडेआजोबा यांची पुढील आध्यात्मिक उन्नतीही अशीच शीघ्र गतीने होईल, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सद्गुरु सत्यवान कदम यांना जाणवलेली वैशिष्ट्ये

सद्गुरु सत्यवान कदम

१. पू. बन्सीधर तावडेआजोबांना वृद्धापकाळात शारीरिक व्याधींमुळे चालता येत नव्हते; पण त्यांनी ही परिस्थिती स्वीकारली. ते आनंदावस्थेत होते.

२. पू. आजोबांची परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा होती. ‘ईश्‍वरी राज्य येणारच आहे आणि ते परात्पर गुरुदेवांमुळेच शक्य होणार आहे’, असे ते सांगत असत.

३. पू. आजोबांना पाहून आनंद जाणवत असे. त्यांचे बोलणे ऐकत रहावेसे वाटत असे.

– सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था.

पू. बन्सीधर तावडेआजोबा यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा भाव

परात्पर गुरु डॉ. आठवले हेच जगद्गुरु आहेत !

‘परात्पर गुरु डॉक्टरांचा माझ्यावर कृपाशीर्वाद आहे. मी भारावून गेलो आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच मला संतपद प्राप्त झाले आहे. वर्ष १९९७ पासून सनातनने जे प्रेम दिले, त्यामुळे मी आज येथेपर्यंत पोचू शकलो. शेवटच्या क्षणापर्यंत मी सनातन सोडणार नाही. परात्पर गुरु डॉक्टर हे जगाचे कल्याण करणारे हिंदु राष्ट्र आणणार आहेत. वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती करणे, हेच संस्थेचे ध्येय आहे. परात्पर गुरु डॉक्टर हेच जगद्गुरु आहेत. त्यामुळेच ते जगाचा विचार करतात.

पू. बन्सीधर तावडेआजोबा यांनी प्रारंभीपासून केलेले साधनेचे प्रयत्न !

‘वर्ष १९९७ मध्ये ओरोस येथे सत्संग झाला. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन व्हावे’, ही तीव्र इच्छा पूर्ण झाली. साधकांनी माझ्याकडून सेवा करवून घेतली. मनात अनेक शंका निर्माण व्हायच्या. त्यामुळे ग्रंथांचा अभ्यास चालू केला. दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्यानंतर अनेक शंकांचे निरसन व्हायला लागले. समाजात प्रसार करण्यासह घरी येणार्‍या प्रत्येकाला साधना सांगू लागलो. त्यामुळे सतत आनंद मिळत गेला. हळूहळू तन, मन आणि धन यांचा त्याग व्हायला लागला. संस्थेच्या कार्यात निराशा कधीच आली नाही. ईश्‍वरी कार्यात आनंदच आहे. प्रसारात गेल्यानंतर सुखदुःखाच्या पलीकडे चिरंतन आनंद आहे, याची अनुभूती आली. परात्पर गुरु डॉक्टर आणि सनातन संस्था यांच्याविना मी राहूच शकत नाही. साधना केल्यासच आपल्याला देव तारणार आहे, अन्यथा नाही. जगातील खरे ज्ञान हे केवळ सनातन संस्थेमध्येच आहे !’

– पू. बन्सीधर तावडेआजोबा