सातारा, ४ जून (वार्ता.) – जिल्ह्यातील कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे जिल्ह्यात १० दिवसांहून अधिक दिवस झाले कडक दळणवळण बंदी करण्यात आली आहे; मात्र कडक दळणवळण बंदीमुळे नागरिकांचे हाल होत असून किराणा, भाजीपाला, गिरण्या आदी बंद असल्यामुळे आता नागरिकांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घेऊन आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा द्यावा. यासाठी नागरिकांनी विविध संघटनांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे दळणवळण बंदी शिथिल करण्याची मागणी केली आहे.