राज्यातील २९ साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – राज्यातील ७३ साखर कारखान्यांकडे १ सहस्र २७७ कोटी रुपयांची किमान मूल्य भावाची रक्कम थकित आहे. त्यापैकी २९ कारखान्यांकडे ९१३ कोटी रुपये थकित आहेत. त्यामुळे या कारखान्यांच्या विरोधात साखर आयुक्तांनी जप्तीची कारवाई केली आहे.

पुणे आणि सोलापूर या विभागांत ऊस मोठ्या प्रमाणात लावला गेल्याने साखरेचे उत्पादनही वाढले आहे. राज्यात वर्ष २०२०-२१ मध्ये गाळप झालेल्या उसाचे २३ सहस्र ३२० कोटी ५७ लाख रुपये देय आहेत. त्यांपैकी २२ सहस्र ४३ कोटी १३ लाख रुपये शेतकर्‍यांना देण्यात आले आहेत.