परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्याचा वैद्यकीय उपचारांसाठी वापरलेल्या वस्तूंवर सकारात्मक परिणाम होणे आणि त्यांच्यावर उपचार करणार्‍या साधकांना आध्यात्मिक लाभ होणे

संतांच्या वस्तूंविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी त्यांच्यावर वेळोवेळी वैद्यकीय उपचार करण्यात येतात. एप्रिल २०२० मध्ये त्यांच्या पाठीवर ‘हॉट कपिंग’ (उष्ण घटीयंत्र चिकित्सा) आयुर्वेदाचे उपचार (टीप) करण्यात आले. हे उपचार आश्रमातील दोन प्रशिक्षित साधकांनी केले. संतांच्या देहातून वातावरणात चैतन्य सतत प्रक्षेपित होत असते. संतांमधील चैतन्यामुळे त्यांचा स्पर्श झालेल्या वस्तू, त्यांचे निवासस्थान (खोली), त्यांच्या संपर्कातील व्यक्ती आणि सभोवतालचे वातावरण आदी चैतन्याने भारित होतात. ‘संतांमधील (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील) चैतन्याचा वैद्यकीय उपचारांच्या वेळी वापरलेल्या वस्तू आणि उपचार करणारे साधक यांच्यावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

टीप – ‘हॉट कपिंग’ (उष्ण घटीयंत्र चिकित्सा) आयुर्वेदाची उपचारपद्धती : ही प्राचीन भारतीय आयुर्वेदाची उपचारपद्धती आहे. कालांतराने ही उपचारपद्धती चीन देशात पोचली. तेथे ती विकसित होऊन ‘चिनी उपचारपद्धती’ म्हणून प्रचलित झाली. या आयुर्वेदाच्या उपचारांमुळे रुग्णाचे रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारते, अवयवांमध्ये होणार्‍या वेदना दूर होतात, स्नायूंमध्ये आलेला घट्टपणा (Muscle Stiffness) दूर होतो, तसेच स्नायूंभोवती असलेले आवरण (fascia) मोकळे होत असल्याने स्नायूंची गुणवत्ता वाढते आणि स्नायू कार्यान्वित करण्यास साहाय्य होते. ‘हॉट कपिंग’ आयुर्वेदाच्या उपचारांसंदर्भातील विस्तृत माहिती ‘इंटरनेट’वर उपलब्ध आहे.

सौ. मधुरा कर्वे

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत पुढील घटकांची ‘हॉट कपिंग’ उपचारांपूर्वी आणि उपचारांनंतर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.

अ. महानारायण तेल : उपचार करण्यापूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांच्या अंगाला हे तेल लावण्यात येते.

आ. ‘हॉट कपिंग’च्या उपचारांसाठी वापरलेल्या वस्तू : काड्याची पेटी, काचेचे कप (टीप १), कापसाचे गोळे लावलेली तार, कापूस (टीप २) आणि स्पिरीट (Spirit)

टीप १ – उपचारांसाठी काचेचे एकूण ९ कप वापरण्यात आले. हे सर्व कप एकत्र ठेवून त्यांच्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

टीप २ – उपचारांपूर्वी कापसाच्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. ‘हॉट कपिंग’ उपचार करतांना कापसावर अग्नीचा संस्कार होत असल्याने कापसाचा काही भाग जळून काळसर होतो. कापसाचा जळालेला काळसर भाग काढून टाकून उर्वरित कापूस पुन्हा वापरण्यात येतो. त्यामुळे चाचणीतील कापूस उपचारांसाठी वापरल्यानंतर त्याचा जळालेला काळसर भाग काढून टाकल्यानंतरच्या कापसाच्या मोजणींच्या नोंदी करण्यात आल्या.

इ. उपचार करणारे २ साधक : तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण

१ अ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर उपचार केल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकातील ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जा नाहीशा होणे : तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकामध्ये आरंभी (उपचारांपूर्वी) ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जा होत्या अन् त्यांची प्रभावळ अनुक्रमे २.४२ मीटर आणि १.४१ मीटर होती. साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर उपचार केल्यानंतर त्याच्यातील दोन्ही नकारात्मक ऊर्जा नाहीशा झाल्या.

१ अ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उपचारांसाठी वापरलेल्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

१ अ ३. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

१ अ ४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर उपचार केल्यानंतर उपचारांसाठी वापरलेल्या वस्तू आणि उपचार करणारे दोन्ही साधक यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर उपचार केल्यानंतर उपचारांसाठी वापरलेल्या वस्तूंच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होण्यामागील कारण : सर्वसाधारण व्यक्ती रुग्णाईत होते, तेव्हा तिला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. तिची देहबुद्धी अधिक असल्याने आणि ती सतत जागृत असल्याने ‘मी रुग्णाईत (आजारी) आहे, मला पुष्कळ वेदना होत आहेत, मी त्रस्त झालो आहे’, असे विचार तिच्या मनात सतत येत असतात. त्यामुळे ती दु:खी होते. यामुळे तिच्याकडून वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. याउलट संतांना देहबुद्धी अत्यल्प असल्याने ते स्वतःला होणार्‍या शारीरिक त्रासांकडे साक्षीभावाने पहातात. त्यांचा मनोलय झालेला असल्याने आणि ते सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात असल्याने संत सतत आनंदावस्थेत असतात. त्यामुळे संत रुग्णाईत असले, तरी त्यांच्या आनंदावस्थेमुळे त्यांच्याकडून वातावरणात चैतन्य प्रक्षेपित होते. परात्पर गुरु डॉ. आठवले ‘परात्पर गुरु’पदावरील ‘समष्टी संत’ आहेत. त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य आहे. त्यांच्याकडून वातावरणात चैतन्य सतत प्रक्षेपित होत असते. त्यांच्यातील चैतन्यामुळे त्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तू, त्यांचा स्पर्श झालेल्या वस्तू, त्यांचे निवासस्थान (खोली), त्यांच्या संपर्कातील व्यक्ती आणि सभोवतालचे वातावरण आदी चैतन्याने भारित होतात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या उपचारांसाठी वापरलेल्या वस्तूंवर त्यांच्या चैतन्यमय देहातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा चांगला परिणाम झाल्याने त्या वस्तूंच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर उपचार करणार्‍या दोन्ही साधकांना आध्यात्मिक लाभ होणे : संत म्हणजे ईश्‍वराचे सगुण रूप ! ‘संतांची सेवा करण्याची संधी मिळणे’, हे साधकांचे महत्भाग्य आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर उपचार करणारे दोन्ही साधक अनेक वर्षांपासून नियमितपणे साधना करत आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांवर उपचार करतांना दोन्ही साधकांचा भाव जागृत होतो. त्यांच्यातील सेवाभाव आणि कृतज्ञताभाव यांमुळे त्यांनी परात्पर गुरु डॉक्टांकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य त्यांच्या क्षमतेनुसार ग्रहण केले. त्यामुळे त्यांना पुढील आध्यात्मिक लाभ झाले.

१. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक : साधकामध्ये आरंभी नकारात्मक ऊर्जा होती, तसेच त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जाही होती. साधकाने परात्पर गुरु डॉक्टरांवर उपचार केल्यानंतर त्याच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्याच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

२. आध्यात्मिक त्रास नसलेला साधक : साधकामध्ये नकारात्मक ऊर्जा नसून सकारात्मक ऊर्जा होती. साधकाने परात्पर गुरु डॉक्टरांवर उपचार केल्यानंतर त्याच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी वापरलेल्या वस्तू चैतन्याने भारित होत असल्याने त्यामुळे आध्यात्मिक लाभ होणे : परात्पर गुरु डॉक्टरांवर वैद्यकीय उपचार करतांना आश्रमातील आधुनिक वैद्य (डॉक्टर), आयुर्वेदाचे वैद्य आणि त्यांचे सहकारी साधक यांना ‘स्वतःला आध्यात्मिक लाभ होत आहेत’, असे जाणवते. तसेच संतांची सेवा करतांना त्यांना विविध अनुभूती येतात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या औषधांच्या गोळ्यांची रिकामी पाकिटे (स्ट्रीप्स्), त्यांच्या औषधांची रिकामी खोकी, त्यांच्या उपचारांसाठी वापरलेले ‘कॉटन गॉज’, ‘बॅण्डेज’ इत्यादी वस्तू साधकांना आध्यात्मिक लाभ मिळण्यासाठी दिल्यावर साधकांना त्यांतून ‘स्वतःला आध्यात्मिक लाभ होत आहेत’, असे जाणवते.

टीप – आध्यात्मिक लाभ : एखाद्या विशिष्ट घटकातील सात्त्विकतेमुळे आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीतील नकारात्मक स्पंदने अल्प किंवा नष्ट होणे आणि सकारात्मक स्पंदनांत वृद्धी होणे, याला ‘आध्यात्मिक लाभ होणे’, असे म्हणतात. आध्यात्मिक त्रास असलेली व्यक्ती साधना करणारी असल्यास तिची संवेदनशीलता वाढलेली असते. त्यामुळे तिला ‘स्वतःला आध्यात्मिक लाभ होत आहे अथवा नाही ?’, हे जाणवू शकते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१६.४.२०२०)

ई-मेल : [email protected]

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक