पुणे – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कोरोना बाधितांसाठी गृह अलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बाधित रुग्णांना घरात अलगीकरणात रहाता येणार नाही तर त्यांना कोविड सेंटर मध्ये अलगीकरणात रहावे लागेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध करून सरकारवर टीका केली आहे. पुण्यातील रुग्ण संख्येत घट होत आहे. त्यामुळे या नियमाची आवश्यकता नाही. कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता असतांना रुग्णांसाठी कोविड सेंटर्स कमी पडतील. त्यामुळे आणखी धोका वाढेल. सरकारने या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.