कोरोनाविरुद्धच्या लढाईत माजी सैनिकांना आवाहन 

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – कोरोनाविरुद्धच्या लढाईत जिल्ह्यातील माजी सैनिकांचा सक्रीय सहभाग आहे. या सैनिकांनी आपली माहिती, तसेच जे माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल किंवा कोरोनाच्या संसर्गामुळे उपचारार्थ भरती झाले आहेत अथवा यापुढेही कोरोनामुळे उपचार करावे लागतील, असे सर्व माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय यांची सर्व माहिती तात्काळ जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे दूरभाष क्रमांक ०२३६२-२२८८२० किंवा भ्रमणभाष क्रमांक ७०२८३१८४०७ आणि ८४०८९६४९७५ या क्रमांकांवर कळवावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ३०१ नवीन रुग्ण

१. उपचार चालू असलेले रुग्ण ४ सहस्र ४२६

२. बरे झालेले एकूण रुग्ण १६ सहस्र १७

३. आतापर्यंतचे एकूण रुग्ण २० सहस्र ९८०

४. २० मे या दिवशी कोरोनामुक्त झालेले रुग्ण ७७९

५. मृत्यू झालेले एकूण रुग्ण ५३१