पुणे – स्पुटनिक-व्ही या रशियन बनावटीच्या लसीच्या विक्रीसाठी महाराष्ट्रासह देशभरात विविध मध्यस्थ प्रयत्नरत आहेत. रशियाने स्पुटनिक लाईट हा लसीचा नवीन नमुना तयार केल्यानंतर स्पुटनिक-व्ही या लसीचे उर्वरित डोस संपवण्यासाठी अनेक मध्यस्थ प्रयत्नरत आहेत. आयटी क्षेत्रासह मोठी आस्थापनेही निधी देण्यासाठी सिद्ध आहेत. महापालिकेच्या स्तरावर ही लस खरेदी करण्यासाठी मध्यस्थांकडून बोलणे चालू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
स्पुटनिक-व्ही या लसीच्या वापरास केंद्र सरकारने अनुमती दिली आहे. त्यामुळे राज्य अथवा केंद्र सरकारनेच या लसीच्या खरेदीची प्रक्रिया राबवावी. तसेच खरेदीतील संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी उच्चपदस्थ सरकारी यंत्रणांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी मागणी राज्यातील अधिकार्यांकडे करण्यात आली आहे.