ऑक्सिजनचा टँकर पोचवण्यात हलगर्जीपणा केल्याने सुपा (नगर) येथील मंडल अधिकारी निलंबित

कोरोनाच्या गंभीर संकटात केलेल्या हलगर्जीपणाला केवळ निलंबन नको, तर कठोर शिक्षाच हवी. अन्यथा त्यांच्याकडून पुन्हा अशाच प्रकारच्या चुका होऊ शकतात.

 

पारनेर – तळोजा (रायगड) येथून नगर येथे ‘मेडिकल ऑक्सिजन’चा टँकर पोचवण्याचे दायित्व सुपा येथील मंडल अधिकारी शिवाजी शिंदे यांच्याकडे होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून वाहन घेऊन पोलीस पथकासह ऑक्सिजन टँकरच्या समवेत जाणे अपेक्षित असतांना शिंदे गेले नाहीत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आणि ‘रीफिलर प्लांट’वर ऑक्सिजन वेळेत पोचला नाही. समन्वय अधिकार्‍यांनी अनेक वेळा दूरध्वनी करूनही त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी शिंदे यांनी कामात हलगर्जीपणा करून कर्तव्यात कसूर केल्याने त्यांचे निलंबन केल्याचे आदेशात म्हटले आहे. शिंदे यांना श्रीगोंदा येथे नेमणूक देण्यात आल्याचे समजते. (असाच हलगर्जीपणा अन्यत्र होणार नाही, याची शाश्‍वती कोण देणार ? – संपादक)

कोरोनाच्या काळात कोविड केंद्रावर नियुक्ती झालेले ५ वैद्यकीय अधिकारी कामावर आल्यामुळे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांना सादर करणार असल्याचे पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.