११.५.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा ७७ वा जन्मोत्सव सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून मयन महर्षि यांनी केलेल्या आज्ञेनुसार या सोहळ्यात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सनातनच्या साधकांना ‘श्रीसत्यनारायण’रूपात दर्शन दिले. एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांनी त्यांचे काढलेले सूक्ष्मचित्र आणि त्याचे विश्लेषण पुढे दिले आहे.
१. विष्णुतत्त्व
१ अ. विष्णुतत्त्वाचा प्रवाह आशीर्वादाच्या स्वरूपात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात आकृष्ट होणे
१ आ. विष्णुतत्त्वाचे निर्गुण वलय परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आज्ञाचक्रस्थानी तेजस्वी स्वरूपात कार्यरत होणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ‘ईश्वरी राज्याची स्थापना करणे’ हे समष्टी ध्येय आहे. या ध्येयपूर्तीसाठी त्यांचा संकल्प कार्यरत असल्याने असे झाले.
१ इ. विष्णुतत्त्वाचे कवच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहाभोवती असणे : याचे कारण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात विष्णुतत्त्व आहे.
१ ई. विष्णुतत्त्वाचे वलय परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मुखाभोवती कार्यरत होऊन ते प्रकाशमान स्वरूपात प्रक्षेपित होणे
१ उ. विष्णुतत्त्वाचे वलय वातावरणात कार्यरत होऊन ते प्रक्षेपित होणे : त्यामुळे ‘आपण साक्षात वैकुंठ लोकातच आहोत’, अशी साधकांना अनुभूती येत होती.
२. तारक शक्ती
२ अ. तारक शक्तीचे वलय परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनाहत चक्रस्थानी कार्यरत होणे
२ आ. तारक शक्तीचे कण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून वातावरणात प्रक्षेपित होणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी आरंभलेल्या ‘ईश्वरी राज्याच्या स्थापने’च्या कार्यात सहभागी असणार्या साधकांना या माध्यमातून आशीर्वाद मिळाला. त्याचबरोबर परात्पर गुरु डॉक्टर सतत साधकांच्या कल्याणाचा विचार करत असल्यामुळे साधकांना साधना करण्यासाठी उत्तम आरोग्य आणि समृद्धी (भराभराट) मिळाली.
३. सगुण चैतन्य
३ अ. सगुण चैतन्याचे वलय परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनाहत चक्रस्थानी कार्यरत होणे
३ आ. सगुण चैतन्याचे वलय प्रकाशमान स्वरूपात वातावरणात प्रक्षेपित होणे : साधकांना चैतन्याची अनुभूती घेता यावी, यासाठी असे झाले.
४. निर्गुण चैतन्य
४ अ. निर्गुण चैतन्याचे वलय प्रकाशमान स्वरूपात वातावरणात प्रक्षेपित होणे
५. आनंद
५ अ. आनंदाचे वलय परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मुखाभोवती तेजस्वी स्वरूपात कार्यरत होणे : परात्पर गुरु डॉ. आठवले निर्गुणावस्थेत असल्यामुळे असे होते.
६. इतर सूत्रे
अ. परात्पर गुरु डॉक्टर सतत निर्गुणावस्थेत असतात. त्यामुळे ते स्थुलातून तेथे असूनही त्यांच्या ठिकाणी केवळ श्रीसत्यनारायण देवाचेच अस्तित्व होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी आरंभलेल्या ‘ईश्वरी राज्याच्या स्थापने’च्या कार्यात स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही स्तरांवर साहाय्य करण्यासाठी सर्व देवता सदैव तत्पर असतात.
आ. श्रीसत्यनारायण आवश्यकतेनुसार एखादी विशिष्ट शक्ती निर्माण करू शकतो. या शक्तीचा व्यक्तीला शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. सध्याच्या कलियुगाच श्रीसत्यनारायण देवाचे तत्त्व (शक्ती) कार्यरत असणे, हे संपूर्ण मानवजातीसाठी पुष्कळ लाभदायक असेल. ‘ईश्वरी राज्याच्या स्थापने’च्या कार्यासाठी या सोहळ्याच्या वेळी ही शक्ती सूक्ष्मातून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे प्रवाहित झाली.
इ. सोहळ्याच्या वेळी कु. शर्वरी कानस्कर हिने परात्पर गुरु डॉक्टरांच्या समोर नृत्य सादर केले. त्या वेळी तिच्याकडून पुष्कळ प्रमाणात भाव प्रक्षेपित होत होता. तिच्यातील भावामुळे हा सोहळा पहाणार्या साधकांचाही भाव जागृत होत होता. त्यामुळे ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या समोर आपणही नृत्य सादर करावे’, अशी उत्कट इच्छा प्रत्येक साधकाच्या मनात निर्माण झाली होती.’
– एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले (६.५.२०२०)
|