ठाणे, ७ मे (वार्ता.) – भिवंडी येथील दापोडा गावाच्या हद्दीतील हरिहर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या रंगकामासाठी वापरल्या जाणार्या ब्रश आस्थापनाच्या गोदामाला ७ मे या दिवशी भीषण आग लागली. तेथे मोठ्या प्रमाणावर ब्रश आणि रसायने यांचा साठा करण्यात आला होता. भिवंडी, कल्याण आणि ठाणे येथील अग्नीशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळले. आगीच्या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील अन्वेषण चालू आहे.