पनवेल, ७ मे (वार्ता.) – कर्जत रस्त्यावर खालापूर तालुक्यातील हातणोली-चौक येथे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचा एन्.डी. स्टुडिओ आहे. येथे असलेल्या ‘जोधा अकबर’ सेटजवळील फायबर मूर्ती गोडाऊन आणि फायबर सेट येथे ७ मे या दिवशी दुपारी १२ वाजता सुमारास भीषण आग लागली. अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. कोरोनामुळे सध्या स्टुडिओमध्ये चित्रीकरण बंद होते. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे; मात्र आगीत सेटची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. याविषयी पुढील अन्वेषण चालू आहे.