चेन्नई – येथील पोलिसांनी २५ वर्षीय डॉक्टर रामसुंदरम् आणि मेडिकल दुकानात काम करणारा २८ वर्षी कार्तिक यांना रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. त्यांच्याकडून ७०० रुपये मूल्याची २४ इंजेक्शने जप्त करण्यात आली. ते एक इंजेक्शन २० सहस्र रुपयांना विकत होते. (डॉक्टरच असे करू लागले, तर सर्वसामान्यांकडून काय अपेक्षा करणार ? – संपादक)