मित्रांसह नियोजनबद्ध कृती करून थोर क्रांतीकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करणारा जळगाव येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा बालसाधक कु. सोहम् उदय बडगुजर (वय ९ वर्षे) !

नेताजी सुभाषचंद्र बोस
चि. सोहम बडगुजर

१. मित्रांना घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्याचे ठरवणे

‘२३.१.२०२१ या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती होती. त्या निमित्ताने आमचा मुलगा चि. सोहम् याने आमच्या वसाहतीमधील (कॉलनीतील) त्याच्या मित्रांना सोबत घेऊन जयंती साजरी करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने पूर्वसिद्धताही केली. त्याने सर्व मित्रांना सोबत घेऊन नियोजनाची एक बैठक घेतली. या कार्यक्रमातून ‘बालपिढीला राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्याविषयी माहिती मिळून मुलांना त्यातून प्रेरणा मिळावी’, या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्याचे नियोजित केले.

२. बर्‍याच मुलांना क्रांतीकारकांच्या कार्याविषयी काहीच माहिती नसल्याचे लक्षात येणे

नियोजन करत असतांना ‘बर्‍याच मुलांना भारत देशासाठी प्राणाचे बलीदान देणार्‍या क्रांतीकारकांची नावेही ठाऊक नव्हती’, असे लक्षात आले. त्या वेळी सोहम्ने अनेक क्रांतीकारकांची नावे सांगून त्यांनी केलेल्या क्रांतीकार्याची माहिती सांगितली. यावर एका मुलाने सांगितले, ‘‘आम्हाला शाळेत याविषयी काही शिकवत नाहीत. भगतसिंह यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारून क्रांती केली’, असे आम्हाला सांगितले आहे.’’

३. अशी झाली नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी !

सोहम्ने जयंतीच्या कार्यक्रमाची सिद्धता करतांना ती सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात येणार्‍या कार्यक्रमांसारखी केली. त्याने कनात लावणे, व्यासपीठ सिद्ध करणे इत्यादी भाग आपल्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासारखा केला होता. कार्यक्रमाच्या वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्री. उदय बडगुजर आणि श्री. चौधरी यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सोहम्ने उपस्थितांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी माहिती सांगतांना  ‘बोस यांनी क्रांतीचा मार्ग कधी स्वीकारला ? त्यांना ‘नेताजी’ ही पदवी कशी मिळाली ? त्यांनी ‘आझाद हिंद सेने’ची स्थापना करून स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वतःचे जीवन कसे समर्पित केले ?’, यांविषयी सांगितले.

कार्यक्रमाची सांगता करतांना मुलांनी ‘प्रजासत्ताक दिनानिमित्त २६.१.२०२१ या दिवशी भारतमातेचे पूजन करावे आणि संपूर्ण ‘वन्दे मातरम् ।’ म्हणून  एखादा कार्यक्रम आयोजित करावा’, असे ठरवले. (त्याप्रमाणे २६.१.२०२१ या दिवशी मुलांनी तो कार्यक्रमही साजरा केला.)’

– श्री. उदय बडगुजर (चि. सोहम्चे वडील), जळगाव (२६.२.२०२१)