माझी गुरुमाऊली सदा कृपेची सावली ।

सर्वांवर कृपादृष्टी असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘श्रीकृष्णाच्या कृपेने सुचलेली कविता गुरुचरणी अर्पण करत आहे.

कु. पार्थ घनवट

गुरुमाऊली सदा कृपेची सावली ।
मज देई आनंद, ही माझी गुरुमाऊली ॥ १ ॥

तिचा वाटतो आधार, ती माझी गुरुमाऊली ।
दाखवते मज चुका, ही माझी गुरुमाऊली ॥ २ ॥

माझ्याकडून प्रयत्न करवून घेते, ती माझी गुरुमाऊली ।
माझे स्वभावदोष घालवते, ती माझी गुरुमाऊली ॥ ३ ॥

मला सतत उत्साही ठेवते, ती माझी गुरुमाऊली ।
कठीण प्रसंगातून बाहेर काढते, ही माझी गुरुमाऊली ॥ ४ ॥

मला सतत कृतज्ञताभावात ठेवते, ती माझी गुरुमाऊली,
आई-बाबांच्या रूपात मला साहाय्य करते, ही माझी गुरुमाऊली ॥ ५ ॥

कृतज्ञ, कृतज्ञ, कृतज्ञ ।
गुरुमाऊली सदा कृपेची सावली ॥ ६ ॥

– कृष्णसखा कु. पार्थ सुनील घनवट (वय १३ वर्षे), पुणे (२.७.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक